Saturday, July 27th, 2024

मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत होणार पूर्ण

छेडा नगर वाहतूक सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द-ठाणे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी रात्री या उड्डाणपुलाचा शेवटचा गर्डर बसवण्यात आला. आता उर्वरित कामे पूर्ण करू हा पूल १५ फेब्रुवारीपासून वाहतूक सेवेत दाखल करण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. हा पूल खुला झाल्यास छेडा नगरमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

Aurangabad : ‘चटई कंपनी’ला भीषण आग लागली

छेडा नगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना अडथळा ठरत होती. त्यामुळे एमएमआरडीएने ‘छेडा नगर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत छेडा नगरमध्ये तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. यातील पहिला तीन पदरी पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शिव आणि ठाणे यांना जोडतो. दुसरा द्विपदरी उड्डाणपूल १,२३५ मीटर लांबीचा असून तो मानखुर्द रोडवरून थेट ठाण्याशी जोडला जाईल.

या मालिकेतील ही अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

तिसरा ६३८ मीटर लांबीचा चेडा नगर उड्डाणपूल सांताक्रूझ ते चेंबूर रस्त्याला जोडला जाणार आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यापैकी ६३८ मीटर लांबीचा चेडा नगर उड्डाणपूल मार्च २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल सांताक्रूझ ते चेंबूर रस्ता प्रकल्पात जोडला गेला असून हा पूल सुरू झाल्याने छेडा नगरमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांब आणि ३७.५ मीटर रुंद भुयारी मार्गाचा पहिला टप्पाही पूर्ण झाला असून तो सेवेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RBI कार्यालयात धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक

मंगळवारी (26 डिसेंबर) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कार्यालयाला बॉम्बची धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हे...

विमा, लॅपटॉप, गॅस सिलिंडर मोफत मिळणार… अमित शहांनी केला तेलंगणाचा जाहीरनामा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाला मजबूत आणि सक्षम करण्यासाठी खूप काम...

लँडिंग करताना विमान जमिनीवर कोसळले

नेपाळमधील पोखरा येथे लँडिंग करताना विमान जमिनीवर आदळले. त्यामुळे विमानाला अचानक आग लागली. विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. विमान अपघातात अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र या अपघातात अनेक प्रवासी जखमी...