Saturday, July 27th, 2024

मावस बहिणीने चोरले १५ लाखाचे सोन्याचे दागिने, पोलिसांनी केली अटक

आपल्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे सोन्याचे १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तक्रादार महिलेच्या मावस बहिणीला मानपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. तिच्याकडून सोन्याचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. लोढा पलावा डाऊन टाऊन संकुलात राहणाऱ्या प्रिया रवि सक्सेना व सीमरन पाटील या मावस बहिणी आहेत. प्रिया सक्सेना या गुरुवारी आपल्या कामानिमित्त नवी मुंबईत कामोठे येथे गेल्या होत्या. प्रवास सुरू होण्यापूर्वी आरोपी सीमरन पाटील यांनी चलाखीने प्रिया यांच्या पर्समधून त्यांच्या घराची चावी, तिजोरीची चावी आणि दरवाजा उघडण्याचे ओळख कार्ड काढून घेतले.

मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत होणार पूर्ण

प्रिया नवी मुंबईमधील कामोठे मध्ये गेल्याची खात्री पटल्यावर कोणाला संशय येऊ नये या हेतूनं आरोपी सीमरन प्रिया यांचा पेहराव करुन प्रियाच्या राहत्या घरी आली. चेहरा सोसायटी आणि परिसरातील सीसीटीव्ही मध्ये दिसू नये म्हणून चेहऱ्या भोवती ओढणीचा पट्टा बांधून घेतला. रिक्षेने ती प्रियाच्या घरी आली. रखवालदाराला प्रिया नेहमीप्रमाणे घरी आली असे वाटले. चावीने दरवाजा उघडून तिजोरीमधील १५ लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन सीमरनने पळ काढला. संध्याकाळी प्रिया घरी आल्यानंतर त्यांना तिजोरीत सोन्याचे दागिने नसल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रवाशांनी लक्ष द्या! रेल्वेने 540 विशेष गाड्या चालवल्या, मार्ग आणि वेळ पहा

होळीच्या दिवशी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने देशभरात ५४० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने सांगितले की, या गाड्या दिल्ली-पाटणा, दिल्ली भागलपूर, दिल्ली मुझफ्फरपूर, दिल्ली-सहरसा, गोरखपूर-मुंबई, कोलकाता-पुरी, गुवाहाटी-रांची, नवी दिल्ली-श्री...

Amazon ने 180 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले, या विभागातील कर्मचाऱ्यांना फटका

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनवर पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार धडकली आहे. ॲमेझॉन आपल्या गेम्स विभागातील 180 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने त्याचे क्राउन चॅनेल बंद केले आहे जे ट्विचवर...

“गरज पडल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस पाडू”, मुख्यमंत्र्यांची वाढत्या प्रदूषणावर प्रतिक्रिया

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहरातील वाढते वायू प्रदूषण ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेसह आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गरज भासल्यास...