Saturday, July 27th, 2024

About Us

नमस्कार,
सतत आपल्या आजूबाजूला घडणा-या घडामोडी, समस्या, चांगल्या-वाईट घटना या जाणून घेण्यासाठी माध्यमाची आवशकता असते. सद्यपरिस्थिती पण भविष्यातील संधी, आजच्या तरुणाईला आकर्षित करणारे गॅजेट्स, बाजारात येणारी विविध उत्पादने, करिअर संधी, गुंतवणूक मार्गदर्शन इत्यादींची माहितीही आपल्या सहजरित्या उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. वृत्तपत्रांच्या भाऊगर्दीमध्ये आपल्याला नेमका हवा असलेला कन्टेन्ट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘गर्जा महाराष्ट्र’ घेत आहे. याच विचाराने ‘गर्जा महाराष्ट्र’ या मराठी वेबसाईटची आम्ही सुरुवात करत आहोत. ‘गर्जा महाराष्ट्र’ संपादक, बातमीदार, छायाचित्रक तसेच प्रत्येक बातमीस योग्य न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण त्यासोबतच आपण जनसंपर्क अधिकारी म्हणून वेगवेगळ्या कंपन्या, संस्था, ब्रॅण्ड आस्थापनाकरीत योग्य तो कॉलम राखीव ठेवत आहोत. त्याचसोबत वाचक म्हणून तुमच्या सहकार्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. तुमच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या बातम्या, मुलाखती, उत्तम लेख, विश्लेषण व इतर मार्गदर्शन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे.