Friday, June 14th, 2024

या मालिकेतील ही अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

‘तारक महता का उल्टा चष्मा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो असून जो गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणी लीडमध्ये आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेनने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिने या मालिकेतून ब्रेक घेतला असला तरी चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. दिशाला या मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दयाबेनची व्यक्तिरेखा दुस-या अभिनेत्याला देण्यापेक्षा निर्माते दिशाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. दिशा वकानी गेल्या पाच वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर असली तरी तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.

Onkar Bhojane: ‘हास्यजत्रा’ सोडण्याचा निर्णय का घेतला? समोर आले कारण

दिशा वाकानी (Disha Vakani) गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणार्‍या महागड्या अभिनेत्रींच्या यादीत दिशाचा समावेश होतो. दिशाची एकूण संपत्ती ३७ कोटी रुपये आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या एका एपिसोडसाठी दिशा १.५ लाख रुपये घेते.

अभिनेत्री दिशा वकाणीने २०१५ मध्ये मयूर पडियासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षानंतर अभिनेत्रीने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मालिकेसोबतच दिशाने ‘देवदास’, ‘मंगल पांडे’, ‘जोधा अकबर’, ‘लव्ह स्टोरी २०५०’ सारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Virat Kohli :विराटने या शतकासह वर्ल्ड रेकर्ड केला, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

दिशाने चित्रपट, जाहिराती आणि इतर ब्रँड एंडोर्समेंटमधून पैसा कमावला आहे. त्यांचे पती व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत पत्नी दिप्तीकडून मोठी अपडेट; म्हणाली..

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला असून त्याला सध्या मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याची गुरुवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयसचे चाहते अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल...

Bigg Boss 17: विकी-अंकिता आणि नील-ऐश्वर्या यांच्यात नामांकनावरून भांडण

बिग बॉस 17 च्या घरात विकी जैन-अंकिता लोखंडे आणि नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांच्यात मैत्री पाहायला मिळाली. दोन्ही जोडपे एकमेकांना बाहेरून ओळखत होते आणि शोमध्ये बॉन्डिंग देखील दिसले होते. पण...

‘वाळवी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट

‘वळवी’ की मराठी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असल्याचे बोलले जात आहे. वळवी सिनेमा सध्या चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत. या चित्रपतनाने बॉक्स ऑफिसवरही...