Thursday, February 29th, 2024

Aurangabad : ‘चटई कंपनी’ला भीषण आग लागली

औरंगाबादच्या वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘मॅट कंपनी’ला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने परिसरात सर्वत्र ज्वाळा दिसत आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे आजूबाजूला आणखी काही कंपन्या असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादच्या वालज औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ‘मॅट कंपनी’ला काही वेळापूर्वी भीषण आग लागली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी सुरू होती. कंपनीत काही कामगारही काम करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आगीचे प्रमाण अधिक असल्याने आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

  लँडिंग करताना विमान जमिनीवर कोसळले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon ने 180 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले, या विभागातील कर्मचाऱ्यांना फटका

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनवर पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार धडकली आहे. ॲमेझॉन आपल्या गेम्स विभागातील 180 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने त्याचे क्राउन चॅनेल बंद केले आहे जे ट्विचवर प्रवाहित...

Zika Virus : बंगळुरूमध्ये आढळला झिका व्हायरस! आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात डासांमध्ये झिका विषाणू आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील शिदलघट्टा तालुक्यातील तलकायलाबेट्टा गावातील डासांमध्ये झिका विषाणू आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उघडकीस आणल्यानंतर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यानंतर, तलकायलबेट्टा गावाच्या पाच...

अखिलेश यादव यांचा भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक

उत्तर प्रदेश :- हरदोई जिल्ह्यातील मल्लवन पोलीस स्टेशन परिसरात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील चार वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच...