Thursday, June 20th, 2024

लँडिंग करताना विमान जमिनीवर कोसळले

नेपाळमधील पोखरा येथे लँडिंग करताना विमान जमिनीवर आदळले. त्यामुळे विमानाला अचानक आग लागली. विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. विमान अपघातात अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे विमान यति एअरलाईन्सचे असून हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. त्यावेळी विमान लँडिंग करताना जमिनीवर आदळले. अचानक विमानाला आग लागली. काही वेळातच आग भडकली. त्यामुळे या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेपाळमधील जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तसेच पोलीस, विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने विमानतळ सध्या बंद आहे. तसेच या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हे विमान पोखराजवळ पोहोचले होते. मात्र, डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन! २४ तासांत ३२८ नवे रुग्ण, केरळमध्ये आणखी एकाचा मृत्यू

केरळमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार JN.1 संसर्गाची पुष्टी झाली आहे. केरळमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३२८ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी...

पश्चिम बंगालचे 9 वेळा लोकसभेचे खासदार वासुदेव आचार्य यांचे निधन 

पश्चिम बंगालच्या पुरुलिया लोकसभा मतदारसंघातून 9 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माकपचे माजी खासदार वासुदेव आचार्य यांचे सोमवारी (13 नोव्हेंबर) वयाच्या 81 व्या वर्षी हैदराबादमध्ये निधन झाले. ज्येष्ठ डावे नेते बासुदेव यांना रुग्णालयात...

जम्मूच्या नरवाल भागात 2 बॉम्बस्फोट, 6 जण जखमी

आज 21 जानेवारी रोजी सकाळी जम्मूच्या नरवाल भागात दोन स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती. जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंग यांनी सांगितले की, नरवाल भागात झालेल्या दुहेरी स्फोटात सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या...