Sunday, September 8th, 2024

Aurangabad : ‘चटई कंपनी’ला भीषण आग लागली

औरंगाबादच्या वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘मॅट कंपनी’ला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने परिसरात सर्वत्र ज्वाळा दिसत आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे आजूबाजूला आणखी काही कंपन्या असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादच्या वालज औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ‘मॅट कंपनी’ला काही वेळापूर्वी भीषण आग लागली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी सुरू होती. कंपनीत काही कामगारही काम करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आगीचे प्रमाण अधिक असल्याने आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 तास घरातच राहिला बिबट्या, 6 जणांवर हल्ला, रेस्क्यू टीम झाली घामाघूम 

दिवाळीनिमित्त रविवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी एका घरात बिबट्या घुसल्याने तामिळनाडूतील कुन्नूर येथील ब्रुकलँड परिसरात दहशत पसरली. ही माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली, त्यानंतर वनविभागाचे बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला आटोक्यात आणण्यात गुंतलेल्या...

मावस बहिणीने चोरले १५ लाखाचे सोन्याचे दागिने, पोलिसांनी केली अटक

आपल्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे सोन्याचे १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तक्रादार महिलेच्या मावस बहिणीला मानपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. तिच्याकडून सोन्याचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. लोढा पलावा...

ब्रेकिंग न्यूज लाईव्ह: दाट धुक्यात प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तालीम कर्तव्य मार्गावर सुरू

सध्या देशात दोन मुद्यांवर सर्वाधिक चर्चा होत आहे. यातील पहिला राम मंदिराचा शुभारंभ आणि दुसरा लोकसभा निवडणुकीचा. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या पूर्णपणे सज्ज झाली आहे. रामललाचा जीवन अभिषेक कार्यक्रम 22 जानेवारीला होणार असून...