Friday, March 1st, 2024

15 तास घरातच राहिला बिबट्या, 6 जणांवर हल्ला, रेस्क्यू टीम झाली घामाघूम 

दिवाळीनिमित्त रविवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी एका घरात बिबट्या घुसल्याने तामिळनाडूतील कुन्नूर येथील ब्रुकलँड परिसरात दहशत पसरली. ही माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली, त्यानंतर वनविभागाचे बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले.

बिबट्याला आटोक्यात आणण्यात गुंतलेल्या बचाव पथकावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. रविवारी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार अग्निशमन आणि बचाव सेवा कर्मचार्‍यांसह सहा जण जखमी झाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याने ज्या महिलेच्या घरात आश्रय घेतला होता तिलाही जखमी केल्याचे त्यांनी सांगितले.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बिबट्या 15 तासांपेक्षा जास्त काळ घरातच होता. यावेळी घर व परिसरात घबराट पसरली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा बिबट्या घरातून बाहेर आला.

  प्राणप्रतिष्ठेला जम्मू-काश्मीरमध्ये ‘हाफ डे’ राहणार, ३६ तास दारूची दुकाने उघडणार नाहीत

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, जखमींवरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहवालानुसार, नंतर बिबट्याने स्थानिक तहसीलदारांच्या चालकावरही हल्ला केला. या प्राण्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील सिपाहिया गावात बिबट्याने एका ६ वर्षाच्या मुलाला पळवून नेले
दरम्यान, उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील सोहेलवा वनपरिक्षेत्रातील लाल नगर सिपाहिया गावातही असाच प्रकार समोर आला आहे. येथे एका बिबट्याने 6 वर्षाच्या मुलाला उचलून नेले. काही तासांनंतर मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी (१२ नोव्हेंबर) ही माहिती दिली. बलरामपूर जिल्हाधिकाऱ्यांनीही बिबट्याला पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आईचा शोध घेण्यासाठी मुलगा शेतात गेला होता.
यूपी वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, गावात शनिवारी संध्याकाळी सूरज वर्मा यांचा मुलगा अरुण आईच्या शोधात घरामागील शेतात गेला होता. दरम्यान, एका बिबट्याने अरुणला जबड्याने पकडून पळ काढला.

  मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब, प्रदूषणात मोठी वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अखिलेश यादव यांचा भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक

उत्तर प्रदेश :- हरदोई जिल्ह्यातील मल्लवन पोलीस स्टेशन परिसरात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील चार वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच...

Zika Virus : बंगळुरूमध्ये आढळला झिका व्हायरस! आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात डासांमध्ये झिका विषाणू आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील शिदलघट्टा तालुक्यातील तलकायलाबेट्टा गावातील डासांमध्ये झिका विषाणू आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उघडकीस आणल्यानंतर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यानंतर, तलकायलबेट्टा गावाच्या पाच...

सुरत विमानतळ बनले आंतरराष्ट्रीय विमानतळ, सरकारने अधिसूचना जारी केली

भारत सरकारने गुजरातमधील सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केले आहे. सहसचिव रुबिना अली यांनी अधिसूचना जारी करून केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ प्रभावाने घेतला आहे. डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय...