Wednesday, June 19th, 2024

Virat Kohli :विराटने या शतकासह वर्ल्ड रेकर्ड केला, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३१७ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने श्रीलेकला ३-० अशा फरकाने क्लीन स्वीप दिला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ३१७ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला अवघ्या २२ षटकांत ७३ धावांत गुंडाळले. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याआधी शुभमन गिल आणि विराट कोहलीने शतके झळकावली. विराटने नाबाद १६६ धावा केल्या. विराटचे या मालिकेतील दुसरे शतक. या शतकासह विराटने विश्वविक्रम केला आहे.

सचिनचा विश्वविक्रम मोडला

विराटने टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विश्वविक्रम मोडला. विराटचे श्रीलंकेविरुद्धचे शतक हे त्याच्या कारकिर्दीतील ४६ वे शतक होते. श्रीलंकेविरुद्धचे हे १०वे शतक होते. हे भारतातील २१वे शतकही ठरले. विराटने सचिन तेंडुलकरचा भारतात सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही मोडला.

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब, प्रदूषणात मोठी वाढ

गुवाहाटी येथे झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने ११३ धावा केल्या होत्या. विराटने यासह सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये नाबाद १६६ धावा केल्या. हे शतक विराटचे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४वे, एकदिवसीय क्रिकेटमधील ४६वे आणि भारताचे २१वे एकदिवसीय शतक ठरले. एवढेच नाही तर विराटने श्रीलंकेविरुद्ध १० शतके झळकावली. कोणत्याही संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करण्याचा हा विक्रम आहे.

महेल जयवर्धने पछाडले होते

या शतकादरम्यान विराटला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत स्थान मिळाले. विराट श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे टाकत सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला. विराटच्या नावावर आता १२ हजार ५८८ धावांचा विक्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Team : या कारणांमुळे आयसीसीने ठोठावला ६० टक्के मॅच फीचा दंड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने १२ धावांनी जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर भारतीय संघासाठी...

टीम इंडियाचा पुनरागमन करणारा विजय शंकरने सलग तिसरे शतक झळकावले

भारताचा स्टार फलंदाज विजय शंकर सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत आहे. तामिळनाडूकडून खेळणाऱ्या विजय शंकरने सलग तीन रणजी सामन्यात तीन शतके झळकावली आहेत. तमिळनाडू आणि आसाम यांच्यातील समन्यातील पहिल्या सामन्यात...

चाहत्यांसाठी वाईट बातमी! क्रिकेट लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचा भाग असणार नाही

2028 मध्ये ऑलिम्पिक खेळ लॉस एंजेलिस येथे होणार आहेत. लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेटचा समावेश होऊ शकतो, असे मानले जात आहे, परंतु क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. खरे तर लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेट दिसणार नाही....