Wednesday, June 19th, 2024

हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती

युक्रेनची राजधानी कीव येथील बालवाडीजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले. यात युक्रेनच्या एका मंत्र्यासह दोन मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. युक्रेनचे पोलिस प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या 16 जणांमध्ये एक मंत्री, दोन लहान मुलं आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इगोरने असेही सांगितले की, मृत मंत्र्याचे नाव डेनिस मोनास्टिसारस्की आहे.

या घटनेत 16 जणांचा मृत्यू

युक्रेनमध्ये एका इमारतीवर हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरला आग लागली. या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले जात आहेत. डेनिस मोनास्टिसेर्स्की हे युक्रेनचे गृहमंत्री होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

हेलिकॉप्टर नेमका कसा कोसळला?

इमारतीला तो कसा धडकला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या अपघातात युक्रेनचे अंतर्गत मंत्री ठार झाले आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

अपघातातील 22 जखमींवर उपचार सुरू आहेत

कीव येथे ही दुर्घटना घडली. या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. त्यात 10 मुलांचा समावेश आहे. जखमी मुलांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत डेनिस मोनोस्टिरस्की (आंतरिक मंत्री), येवेन येनिन आणि युरी लुबोकोचिव हे तीन मंत्री मरण पावले आहेत. कीवचे गव्हर्नर ओलेक्सी यांनी माहिती दिली की जेव्हा ही घटना घडली तेव्हा बालवाडी, मुलांच्या शाळेमध्ये मुले आणि इतर कर्मचारी होते. या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. त्यात 10 मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी अपघात होताच तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING: माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात,कारला डंपरची धडक

घोडबंदरहून पालघरच्या दिशेने जात असताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झाला. डंपरने कारला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. डंपर चालकाला काश्मिरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून सावंत यांना स्वत: रुग्णवाहिकेतून मुंबईतील क्रिटीकेअर...

आसाममध्ये जादूटोणा करणाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागणार, नवा कायदा केला

आसाम सरकारने बुधवारी अशास्त्रीय उपचार पद्धती नष्ट करण्याच्या उद्देशाने विधानसभेत एक नवीन कायदा प्रस्तावित केला. प्रस्तावित कायद्यात दुर्भावनापूर्ण हेतू असलेल्या व्यक्तींद्वारे ‘जादुई उपचार’ गुन्हेगारी करण्याची तरतूद आहे, ज्यामुळे तो दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा...

हवामान अंदाज: थंडीची लाट कायम, पुढील पाच दिवस दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हवामान कसे असेल?

बुधवारी (10 जानेवारी) दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली. या काळात पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागात धुक्याची चादर दिसून आली. त्यामुळे येथे दृश्यमानताही खूपच कमी आहे. दरम्यान, उत्तर-पश्चिम भारताच्या विविध...