Saturday, July 27th, 2024

पिंपळाचे झाड तोडल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

खोपट येथील खासगी रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान रुग्णालय प्रशासनाने पिंपळाचे झाड तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रुग्णालय व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती

खोपट येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाजवळ खासगी रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या आवारातील पिंपळाचे झाड तोडले होते. डिसेंबर महिन्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली होती.

Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीप नवा लूक करून शिकवणार शालिनीला धडा

या तक्रारीच्या आधारे वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली असता, तोडलेल्या पिंपळाच्या झाडाचा बुंधा आढळून आला. त्यामुळे येथे झाड तोडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे रुग्णालय व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जम्मूच्या नरवाल भागात 2 बॉम्बस्फोट, 6 जण जखमी

आज 21 जानेवारी रोजी सकाळी जम्मूच्या नरवाल भागात दोन स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती. जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंग यांनी सांगितले की, नरवाल भागात झालेल्या दुहेरी स्फोटात सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या...

दिल्लीत पावसानंतर थंडी वाढली, यूपीसह या राज्यांमध्ये कसे असेल हवामान, जाणून घ्या अपडेट

देशाची राजधानी दिल्लीत गुरुवारी रात्रीपासून पावसाने दडी मारल्यानंतर वातावरण निवळले असून प्रदूषणाच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळेच दिल्लीचा AQIही बराच कमी झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच शनिवारी (11 नोव्हेंबर)...

दिल्लीच्या ‘विषारी हवेचा’ हृदयावरही होतोय परिणाम, जाणून घ्या कसा वाढतोय हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका

दिल्लीची हवा सध्या खूप विषारी झाली आहे. सध्या दिल्लीतील जवळपास प्रत्येक भागात AQI 400 च्या पुढे आहे. अशा परिस्थितीत दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे विष श्वास घेण्यासारखे आहे. दरम्यान, बेंगळुरूमधील हृदयरोगतज्ज्ञांनी म्हटले आहे...