Saturday, May 18th, 2024

Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीप नवा लूक करून शिकवणार शालिनीला धडा

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत जयदीप-गौरी भेटले पण शालिनीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे ज्यामुळे जयदीप-गौरी यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले. शालिनीला तिच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी जयदीप वेशात शिर्के पाटलाच्या घरात प्रवेश करेल. यासाठी जयदीपने एका वृद्धाचा लूक केला असून तो लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक म्हणजेच जयवंत देशमुख असल्याचे भासवणार आहे.

खरंतर शालिनीने लहानग्या लक्ष्मीला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला. लेकीच्या प्रेमापोटी जयदीपला शिर्के पाटलाच्या घरापासून दूर राहावे लागले. त्याने गौरीपासूनही दुरावले. पण आता जयदीप गौरी एकत्र आले आहेत. शालिनीने गौरीला त्याच्या अनुपस्थितीत दिलेल्या त्रासाचा बदला जयदीपला घ्यायचा आहे. त्यामुळेच त्याने नवीन रूप धारण केले आहे.

शालिनी पैशाची लोभी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक घरी आल्यावर शालिनीचाही त्याच्या पैशावर डोळा असतो. पैसे मिळवण्यासाठी ती काहीही करेल. त्यामुळे जयवंत देशमुखच्या रुपात नवा अवतार घेतलेल्या जयदीपच्या तालावर शालिनी कशी नाचणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गिरीजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’  या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेचे कथानकही प्रेक्षकांची मने जिंकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत पत्नी दिप्तीकडून मोठी अपडेट; म्हणाली..

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला असून त्याला सध्या मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याची गुरुवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयसचे चाहते अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल...

पठाण सिनेमाचा ट्रेलर थेट बुर्ज खलीफावर; शाहरुख खान याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला

अभिनेता शाहरुख खान सध्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोणची भगवी बिकिनी वादात सापडली होती. मात्र आता सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला...

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या

रणदीप हुड्डा त्याच्या बहुप्रतिक्षित बायोपिक ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. अखेर त्याचा बायोपिक थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वजण अभिनेत्याच्या अभिनयाचे...