Saturday, September 7th, 2024

हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती

युक्रेनची राजधानी कीव येथील बालवाडीजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले. यात युक्रेनच्या एका मंत्र्यासह दोन मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. युक्रेनचे पोलिस प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या 16 जणांमध्ये एक मंत्री, दोन लहान मुलं आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इगोरने असेही सांगितले की, मृत मंत्र्याचे नाव डेनिस मोनास्टिसारस्की आहे.

या घटनेत 16 जणांचा मृत्यू

युक्रेनमध्ये एका इमारतीवर हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरला आग लागली. या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले जात आहेत. डेनिस मोनास्टिसेर्स्की हे युक्रेनचे गृहमंत्री होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

हेलिकॉप्टर नेमका कसा कोसळला?

इमारतीला तो कसा धडकला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या अपघातात युक्रेनचे अंतर्गत मंत्री ठार झाले आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

अपघातातील 22 जखमींवर उपचार सुरू आहेत

कीव येथे ही दुर्घटना घडली. या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. त्यात 10 मुलांचा समावेश आहे. जखमी मुलांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत डेनिस मोनोस्टिरस्की (आंतरिक मंत्री), येवेन येनिन आणि युरी लुबोकोचिव हे तीन मंत्री मरण पावले आहेत. कीवचे गव्हर्नर ओलेक्सी यांनी माहिती दिली की जेव्हा ही घटना घडली तेव्हा बालवाडी, मुलांच्या शाळेमध्ये मुले आणि इतर कर्मचारी होते. या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. त्यात 10 मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी अपघात होताच तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather Update : ‘या’ भागात पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात गारठा वाढला; आजचं हवामान कसं असेल?

राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. सकाळपासूनच अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडू लागले आहे, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या २-३ दिवसांत उत्तर-पश्चिम...

औरंगाबादेत होलसेल कापड दुकानाला भीषण आग: परिसरात धुराचे लोट

औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या शहागंज भागातील कापड मार्केटला भीषण आग लागली. आगीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे...

विमा, लॅपटॉप, गॅस सिलिंडर मोफत मिळणार… अमित शहांनी केला तेलंगणाचा जाहीरनामा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाला मजबूत आणि सक्षम करण्यासाठी खूप काम...