Saturday, July 27th, 2024

औरंगाबादेत होलसेल कापड दुकानाला भीषण आग: परिसरात धुराचे लोट

औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या शहागंज भागातील कापड मार्केटला भीषण आग लागली. आगीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहागंज परिसरात असलेल्या न्यू फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामाला दुपारच्या सुमारास आग लागली. आग लागल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट दिसून आले. औरंगाबाद महापालिकेच्या सात अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने अग्निशमन दलाला अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.

आगीच्या घटनेने परिसरात खळबळ

औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या शहागंज परिसरात कपड्यांचा बाजार आहे. आजूबाजूला कापडाची मोठी घाऊक दुकाने आहेत. या ठिकाणी जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी येतात. दरम्यान, आज दुपारी लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई, ममतांच्या मंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा, 40 लाख रुपये जप्त

पश्चिम बंगालचे मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या बीरभूम जिल्ह्यातील निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी 14 तास छापे टाकले. ईडीने त्याच्या मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे, एक मोबाईल फोन आणि 40 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम...

निवडणुकीचे काउंटडाऊन, आजही तीन जिल्ह्यांमध्ये PM मोदींचा झंझावाती दौरा, असा आहे वेळापत्रक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निवडणूक राज्य मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते तीन जिल्ह्यांचा झंझावाती दौरा करणार आहेत, या जिल्ह्यांमध्ये 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, त्यासाठी पंतप्रधान भाजपचा प्रचार करणार आहेत. राज्यातील आगामी...

भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाच्या या हालचालीमुळे चीनला चीड येणार

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत दौऱ्यात इंग्लंडच्या खेळाडूंनी असे पाऊल उचलले की चीनला त्रास होईल हे निश्चित. वास्तविक, इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली. या काळात...