Friday, October 18th, 2024

पिंपळाचे झाड तोडल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

खोपट येथील खासगी रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान रुग्णालय प्रशासनाने पिंपळाचे झाड तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रुग्णालय व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती

खोपट येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाजवळ खासगी रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या आवारातील पिंपळाचे झाड तोडले होते. डिसेंबर महिन्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली होती.

Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीप नवा लूक करून शिकवणार शालिनीला धडा

या तक्रारीच्या आधारे वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली असता, तोडलेल्या पिंपळाच्या झाडाचा बुंधा आढळून आला. त्यामुळे येथे झाड तोडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे रुग्णालय व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, मैदानी राज्यांमध्ये पारा घसरणार, तामिळनाडूत मुसळधार पाऊस

आजचे हवामान अपडेट: सध्या उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये हवामान बदलले आहे. अनेक राज्यांमध्ये दिवसा एवढी थंडी नसली तरी सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत...

Nashik : राहुड घाटात बसला भीषण आग

गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या विविध भागात बसेसला आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. काही अपघातांमध्ये तर प्रवाशांचा अंगावर धावून मृत्यू झाला आहे. असे असतानाही राज्य शासकीय परिवहन महामंडळाच्या बसेसला आग लागण्याच्या घटनांमध्ये कोणतीही घट...

Accident : समृद्धी महामार्गावर 35 फुटांवरुन कार खाली कोसळली, सिन्नर शिवारात दोन भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून सिन्नर शिवारात झालेल्या दोन अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. यातील एका अपघातात कार 35 फूट उंचीवरून खाली पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, समृद्धी...