Saturday, July 27th, 2024

Accident : समृद्धी महामार्गावर 35 फुटांवरुन कार खाली कोसळली, सिन्नर शिवारात दोन भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून सिन्नर शिवारात झालेल्या दोन अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. यातील एका अपघातात कार 35 फूट उंचीवरून खाली पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शिर्डी ते भरवीर या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र उद्घाटन झाल्यापासून अपघाताच्या घटना समोर येत आहेत. समृद्धी महामार्गावर काल चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार 35 फूट उंच पुलावरून थेट अंडरपास रस्त्यावर पडली. ही घटना सिन्नर तालुक्यातील आगसखिंड शिवारात दुपारी दीडच्या सुमारास घडली. अपघातात कार सुमारे 35 फूट उंचीवरून पडून चक्काचूर झाली. या अपघातात घणसोली नवी मुंबई येथील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबईतील घणसोली येथील गोयल कुंटुबाचे तिघेजण स्विफ्ट कारमधून घोटीहून शिर्डीला जात होते. भरवीर येथील समृद्धी महामार्ग टोल प्लाझामध्ये प्रवेश केल्यानंतर ते समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे निघाले होते. आगसखिंड शिवारात कार आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. आगसखिंड शिवारातील अंडरपास पुलाजवळ दोन लेनमधील पुलाच्या रेलिंगला कार धडकली. यानंतर खाली जाणाऱ्या शिवार रस्त्यावर कारचा अपघात झाला. आगसखिंड येथील शिवरोड येथील कूपनलिका रोड परिसरात सुमारे 35 फूट उंचीवरून खाली पडल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

महामार्गावर काम करणाऱ्या काही लोकांनी हा अपघात पाहिला आणि त्यांनी तातडीने टोल बुथवर अपघाताची माहिती दिली. या अपघातात सनरिस गोयल, हेमिना गोयल आणि दिव्या गोयल यांचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील घणसोली येथे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेतून एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघाताची माहिती घेतली.

फुलेनगर शिवारात अपघात

समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील फुलेनगर माळवाडी शिवारात सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. हायवे पोलीस स्टेशन सिन्नर हद्दीतील समृद्धी महामार्ग माळवाडी-फुले नगर शिवारात सिन्नरहून शिर्डीकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारचा उजवा समोरचा टायर फुटल्याने गाडीवरील ताबा सुटला. संबंधित वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्ड प्लेटला धडकले. या अपघातात चालक राशिद खान आणि अन्य दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त वाहन वावी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

भारतात मालदीववर बहिष्कार सुरू, EaseMyTrip ने सर्व फ्लाइटचे बुकिंग केले बंद | Maldives News

मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा परिणाम दिसू लागला आहे. मालदीवविरोधात ऑनलाइन बहिष्कार मोहीम सुरू झाली आहे. ऑनलाइन प्रवासी कंपनी EaseMyTrip ने मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग निलंबित केले...

मावस बहिणीने चोरले १५ लाखाचे सोन्याचे दागिने, पोलिसांनी केली अटक

आपल्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे सोन्याचे १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तक्रादार महिलेच्या मावस बहिणीला मानपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. तिच्याकडून सोन्याचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. लोढा पलावा...

Pushya Nakshatra दिवाळीपूर्वी पुष्य नक्षत्राचा दुर्मिळ योगायोग

दिवाळीच्या अगदी एक आठवडा आधी म्हणजेच शनिवार 4 नोव्हेंबर आणि रविवार 5 नोव्हेंबरला पुष्य नक्षत्राचा दुर्मिळ संयोग होत आहे. दुर्मिळ कारण दोन्ही दिवशी 8 शुभ योग आहेत. शनि आणि रविपुष्य यांच्याशी अष्ट महायोगाचा...