Sunday, September 8th, 2024

मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत होणार पूर्ण

छेडा नगर वाहतूक सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द-ठाणे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी रात्री या उड्डाणपुलाचा शेवटचा गर्डर बसवण्यात आला. आता उर्वरित कामे पूर्ण करू हा पूल १५ फेब्रुवारीपासून वाहतूक सेवेत दाखल करण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. हा पूल खुला झाल्यास छेडा नगरमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

Aurangabad : ‘चटई कंपनी’ला भीषण आग लागली

छेडा नगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना अडथळा ठरत होती. त्यामुळे एमएमआरडीएने ‘छेडा नगर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत छेडा नगरमध्ये तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. यातील पहिला तीन पदरी पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शिव आणि ठाणे यांना जोडतो. दुसरा द्विपदरी उड्डाणपूल १,२३५ मीटर लांबीचा असून तो मानखुर्द रोडवरून थेट ठाण्याशी जोडला जाईल.

या मालिकेतील ही अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

तिसरा ६३८ मीटर लांबीचा चेडा नगर उड्डाणपूल सांताक्रूझ ते चेंबूर रस्त्याला जोडला जाणार आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यापैकी ६३८ मीटर लांबीचा चेडा नगर उड्डाणपूल मार्च २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल सांताक्रूझ ते चेंबूर रस्ता प्रकल्पात जोडला गेला असून हा पूल सुरू झाल्याने छेडा नगरमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांब आणि ३७.५ मीटर रुंद भुयारी मार्गाचा पहिला टप्पाही पूर्ण झाला असून तो सेवेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पिंपळाचे झाड तोडल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

खोपट येथील खासगी रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान रुग्णालय प्रशासनाने पिंपळाचे झाड तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रुग्णालय व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल...

ICC World Cup Final: अहमदाबाद विमानतळ अंतिम सामन्यापूर्वी इतके दिवस राहणार बंद

ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबाद, गुजरात येथे होणार आहे. दरम्यान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक सल्लागार जारी केला आहे....

विमा, लॅपटॉप, गॅस सिलिंडर मोफत मिळणार… अमित शहांनी केला तेलंगणाचा जाहीरनामा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाला मजबूत आणि सक्षम करण्यासाठी खूप काम...