Friday, July 26th, 2024

कुत्र्याच्या भीतीने Swiggy बॉयने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. याबाबतच्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचत असतो, पाहत असतो. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर आली आहे. ज्यामध्ये एका डिलिव्हरी बॉयला आपला जीव गमवावा लागला आहे.

हैदराबादमधील एका अपार्टमेंटमध्ये फूड ऑर्डर देत असताना एका डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने हल्ला केला. यावेळी घाबरलेल्या डिलिव्हरी बॉयने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची घटना घडली. डिलिव्हरी बॉयवर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याची मृत्यूशी लढाई अयशस्वी झाली.

मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत होणार पूर्ण

मोहम्मद रिजवान असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २३ वर्षीय डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. रिझवान हा बंजारा हिल्स येथील अपार्टमेंटमधील के. शोभना नावाच्या व्यक्तीसाठी जेवणाची ऑर्डर देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शोभना यांच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला असता पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याने रिझवानवर हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्याने घाबरलेल्या रिझवानने स्वत:ला वाचवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.

मावस बहिणीने चोरले १५ लाखाचे सोन्याचे दागिने, पोलिसांनी केली अटक

डिलिव्हरी बॉयला इमारतीवरून खाली उडी मारताना पाहून कुत्र्याच्या मालकाने रुग्णवाहिका बोलावली आणि रिजवानला रुग्णालयात दाखल केले. मात्र, खूप उंचावरून उडी मारल्याने रिझवानची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिल्लीकरांनी थरथरत्या थंडीसाठी सज्ज व्हावे! उत्तर प्रदेशसह ही राज्ये दाट धुक्याने व्यापतील

देशभरात वाढत्या थंडीनंतर हवामानाचा मूड बदलू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुके पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडी वाढली असताना दक्षिणेत मात्र पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्यानुसार, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप, कर्नाटकमध्ये...

देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन! २४ तासांत ३२८ नवे रुग्ण, केरळमध्ये आणखी एकाचा मृत्यू

केरळमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार JN.1 संसर्गाची पुष्टी झाली आहे. केरळमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३२८ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी...

अखिलेश यादव यांचा भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक

उत्तर प्रदेश :- हरदोई जिल्ह्यातील मल्लवन पोलीस स्टेशन परिसरात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील चार वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे....