डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. याबाबतच्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचत असतो, पाहत असतो. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर आली आहे. ज्यामध्ये एका डिलिव्हरी बॉयला आपला जीव गमवावा लागला आहे.
हैदराबादमधील एका अपार्टमेंटमध्ये फूड ऑर्डर देत असताना एका डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने हल्ला केला. यावेळी घाबरलेल्या डिलिव्हरी बॉयने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची घटना घडली. डिलिव्हरी बॉयवर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याची मृत्यूशी लढाई अयशस्वी झाली.
मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत होणार पूर्ण
मोहम्मद रिजवान असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २३ वर्षीय डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. रिझवान हा बंजारा हिल्स येथील अपार्टमेंटमधील के. शोभना नावाच्या व्यक्तीसाठी जेवणाची ऑर्डर देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शोभना यांच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला असता पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याने रिझवानवर हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्याने घाबरलेल्या रिझवानने स्वत:ला वाचवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.
मावस बहिणीने चोरले १५ लाखाचे सोन्याचे दागिने, पोलिसांनी केली अटक
डिलिव्हरी बॉयला इमारतीवरून खाली उडी मारताना पाहून कुत्र्याच्या मालकाने रुग्णवाहिका बोलावली आणि रिजवानला रुग्णालयात दाखल केले. मात्र, खूप उंचावरून उडी मारल्याने रिझवानची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला.