Saturday, September 7th, 2024

मावस बहिणीने चोरले १५ लाखाचे सोन्याचे दागिने, पोलिसांनी केली अटक

आपल्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे सोन्याचे १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तक्रादार महिलेच्या मावस बहिणीला मानपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. तिच्याकडून सोन्याचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. लोढा पलावा डाऊन टाऊन संकुलात राहणाऱ्या प्रिया रवि सक्सेना व सीमरन पाटील या मावस बहिणी आहेत. प्रिया सक्सेना या गुरुवारी आपल्या कामानिमित्त नवी मुंबईत कामोठे येथे गेल्या होत्या. प्रवास सुरू होण्यापूर्वी आरोपी सीमरन पाटील यांनी चलाखीने प्रिया यांच्या पर्समधून त्यांच्या घराची चावी, तिजोरीची चावी आणि दरवाजा उघडण्याचे ओळख कार्ड काढून घेतले.

मानखुर्द-ठाणे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत होणार पूर्ण

प्रिया नवी मुंबईमधील कामोठे मध्ये गेल्याची खात्री पटल्यावर कोणाला संशय येऊ नये या हेतूनं आरोपी सीमरन प्रिया यांचा पेहराव करुन प्रियाच्या राहत्या घरी आली. चेहरा सोसायटी आणि परिसरातील सीसीटीव्ही मध्ये दिसू नये म्हणून चेहऱ्या भोवती ओढणीचा पट्टा बांधून घेतला. रिक्षेने ती प्रियाच्या घरी आली. रखवालदाराला प्रिया नेहमीप्रमाणे घरी आली असे वाटले. चावीने दरवाजा उघडून तिजोरीमधील १५ लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन सीमरनने पळ काढला. संध्याकाळी प्रिया घरी आल्यानंतर त्यांना तिजोरीत सोन्याचे दागिने नसल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज लाईव्ह: दाट धुक्यात प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तालीम कर्तव्य मार्गावर सुरू

सध्या देशात दोन मुद्यांवर सर्वाधिक चर्चा होत आहे. यातील पहिला राम मंदिराचा शुभारंभ आणि दुसरा लोकसभा निवडणुकीचा. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या पूर्णपणे सज्ज झाली आहे. रामललाचा जीवन अभिषेक कार्यक्रम 22 जानेवारीला होणार असून...

Cyclone Midhilaबंगालच्या उपसागरात ‘मिधिला’ चक्रीवादळाचं सकटं, ‘या’ दोन राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा!

बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (17 नोव्हेंबर) चक्रीवादळ निर्माण झाले. ताशी 80 किमीच्या कमाल वेगासह, बांगलादेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी ते सुंदरबनमधून जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) एका बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे. बुलेटिनमध्ये म्हटले...

दिल्ली हवामान अपडेट: राष्ट्रीय राजधानीत ढगाळ वातावरण

राष्ट्रीय राजधानी बुधवारी सकाळी ढगाळ झाली कारण किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त होते. भारतीय हवामान विभाग IMD नुसार, कमाल तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता...