Sunday, September 8th, 2024

BREAKING: माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात,कारला डंपरची धडक

घोडबंदरहून पालघरच्या दिशेने जात असताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झाला. डंपरने कारला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. डंपर चालकाला काश्मिरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून सावंत यांना स्वत: रुग्णवाहिकेतून मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती

दीपक सावंत पालघरच्या मोखाड्यातील कुपोषित बालकांच्या मृत्यूचा आढावा घेणार होते. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास ते घोडबंदर येथील सगनई नाक्याजवळ आले असता त्यांच्या कारला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. सावंत यांच्या पाठीला दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

Nashik : राहुड घाटात बसला भीषण आग

अपघाताची माहिती मिळताच काश्मिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपर चालक इर्शाद शहजाद खान याला अटक केली. सावंत यांनी स्वत: रुग्णवाहिकेतून प्रवास करून अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या घटनेतील दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मावस बहिणीने चोरले १५ लाखाचे सोन्याचे दागिने, पोलिसांनी केली अटक

आपल्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे सोन्याचे १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तक्रादार महिलेच्या मावस बहिणीला मानपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. तिच्याकडून सोन्याचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. लोढा पलावा...

Zika Virus : बंगळुरूमध्ये आढळला झिका व्हायरस! आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात डासांमध्ये झिका विषाणू आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील शिदलघट्टा तालुक्यातील तलकायलाबेट्टा गावातील डासांमध्ये झिका विषाणू आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उघडकीस आणल्यानंतर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यानंतर, तलकायलबेट्टा गावाच्या...

ईडीची मोठी कारवाई, शेख शाहजहानची १२.७८ कोटींची मालमत्ता जप्त

केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने संदेशखळी प्रकरणातील आरोपी शेख शाहजहानवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने शेख शाहजहानची १२.७८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत शाहजहानच्या 14 मालमत्ता जप्त केल्या आहेत....