Friday, July 26th, 2024

महाड MIDC तील ‘ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीत भीषण स्फोट

रायगड – महाड एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 3 जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

रायगड – महाड येथील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचा परिसर हादरला. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली. त्यामुळे कामगारांचे हाल झाले आहेत. एका कामगाराला गॅसची लागण होऊन काही कामगार अडकले असण्याची भीती आहे. अद्याप 11 कामगार बेपत्ता असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बानापुरे यांनी दिली. बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. आग आटोक्यात आली असली तरी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी हजर आहेत.

स्फोटानंतर प्लांटमध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आसाममध्ये जादूटोणा करणाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागणार, नवा कायदा केला

आसाम सरकारने बुधवारी अशास्त्रीय उपचार पद्धती नष्ट करण्याच्या उद्देशाने विधानसभेत एक नवीन कायदा प्रस्तावित केला. प्रस्तावित कायद्यात दुर्भावनापूर्ण हेतू असलेल्या व्यक्तींद्वारे ‘जादुई उपचार’ गुन्हेगारी करण्याची तरतूद आहे, ज्यामुळे तो दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा...

बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई, ममतांच्या मंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा, 40 लाख रुपये जप्त

पश्चिम बंगालचे मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या बीरभूम जिल्ह्यातील निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी 14 तास छापे टाकले. ईडीने त्याच्या मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे, एक मोबाईल फोन आणि 40 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम...

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब, प्रदूषणात मोठी वाढ

आज मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबईतील तापमानात घट झाल्यानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या पुन्हा डोके वर काढू शकतात. मुंबईतील किमान...