प्रवासी वाहने, दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्या मजबूत नोंदणीमुळे जानेवारीमध्ये देशातील वाहनांच्या एकूण किरकोळ विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) सोमवारी ही माहिती दिली. जानेवारी 2023 मध्ये, विविध श्रेणींमध्ये वाहनांची एकूण विक्री 18,26,669 युनिट्सपर्यंत वाढली.
जानेवारी 2022 मध्ये, वाहन विक्रीचा आकडा 16,08,505 युनिट्स इतका होता. गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची नोंदणी 22 टक्क्यांनी वाढून 3,40,220 युनिट्सवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत प्रवासी वाहनांची नोंदणी २,७९,०५० युनिट होती. त्याचप्रमाणे दुचाकींची किरकोळ विक्री गेल्या महिन्यात 12,65,069 युनिट्सपर्यंत वाढली, जी जानेवारी 2022 मध्ये 11,49,351 युनिट होती. अशा प्रकारे दुचाकींच्या विक्रीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तीनचाकी वाहनांची किरकोळ विक्री 59 टक्क्यांनी वाढून 41,487 युनिट झाली आहे. त्याच वेळी, व्यावसायिक वाहनांची नोंदणी 16 टक्क्यांनी वाढून 82,428 युनिट्सवर पोहोचली आहे. जानेवारी 2022 मध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री 70,853 युनिट्सवर होती. त्याचप्रमाणे ट्रॅक्टरची विक्री गेल्या महिन्यात आठ टक्क्यांनी वाढून ७३,१५६ युनिट्सवर पोहोचली.
जानेवारी 2022 मध्ये हा आकडा 67,764 युनिट होता. FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, जानेवारीमध्ये वाहनांची एकूण किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वाढली आहे, परंतु ती अजूनही कोविडपूर्व म्हणजेच जानेवारी, 2020 च्या तुलनेत आठ टक्के कमी आहे.
व्यवसायाच्या दृष्टिकोनाबाबत, सिंघानिया म्हणाले की चीनमधील कारखाना क्रियाकलाप पुन्हा वाढल्याने, घटक आणि सेमीकंडक्टरसाठी जागतिक पुरवठा परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. यामुळे वाहनांचा पुरवठा सुधारेल आणि प्रतीक्षा कालावधी कमी होईल.